भारत आज दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकत चॅम्पियन बनला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 17 वर्षानंतर भारताने पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. तर, 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.
आजच्या साऊथ आफ्रिकेबरोबरच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असे वाटत होते. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिले . त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत फेल ठरल्यानंतर विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 176 धावा केल्या होत्या. मात्र साऊथ अफ्रिकाकडून हेन्रिक क्लासेनने 52 धावांची वादळी खेळी केली.आणि त्यानंतर हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या खेळाला सुरवात झाली. हा विश्वकप आता भारताच्या हातातून जातो का काय असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचने सामना अक्षरशः पलटवला. बुमराहच्या गोलंदाजीसमोर चोकर्स चित झाले आणि टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली .