12 जुलै रोजी महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. अकरा जागांपैकी विधान परिषदेच्या पाच जागा भाजप लढविणार आहे. त्यासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्याच दिवशी निकालही जाहीर होतील.
भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहे या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहिल्यास भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेतलेला दिसतो. त्याचाच भाग म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीत जातीय समतोल राखून उमेदवार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मित्र पक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चा चे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने उमेदवारी दिली आहे.
पाच जागांसाठी भाजपने वरिष्ठ नेतृत्वाकडे एकूण 11 जागांची यादी पाठवली होती. आगामी विधानसभा निवडणूक व राजकीय समीकरणात लक्षात घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने यापैकी पाच नावांवर शिक्कामार्फत केले आहे. यामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात आपले मत किंवा मतदारसंघातील प्रश्न मांडताना दिसणार आहेत.