नेपाळमधील पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड ( Pushpa Kamal Dahal Prachanda) यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आता आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (M&L) प्रमुख आणि सत्ताधारी आघाडीतील प्रमुख भागीदार केपी शर्मा ओली (KP Sharma Oli ) ह्यांनी विरोधी पक्षनेते शेरबहादूर देउबा यांच्यासमवेत नवीन युती करण्याचे निश्चित केले आहे.आणि आता ते दहल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
केपी शर्मा ओली आज सकाळी दहल यांच्या निवासस्थानी पोहोचले,आणि त्यांनी दहल यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान नव्या आघाडीचे वर्चस्व वाढल्यामुळे दहल यांना बहुमत गमवावे लागले आहे.
प्रत्युत्तरात दहल म्हणाले की, पंतप्रधान म्हणून ते पद सोडण्यास तयार आहेत आणि सध्याच्या सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व ओली करू शकतात,मात्र, त्याला स्पष्टपणे नकार देत नव्या युतीची तयारी पूर्ण झाली असून पुनर्विचार शक्य नाही असे ओली यांनी सांगितले आहे.