आज पुण्यनगरीत म्हणजेच पुणे शहरात आणखी एक झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. मुळे दिवसेंदिवस पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पुणे शहरातील एरंडवणे परिसरातील एका महिलेस झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
दरम्यान आज पुण्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी देखील मुक्कामी आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर झिका वायरसचा वाढता प्रादुर्भाव हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय झाला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या एरंडवणे भागात दोन झिका वायरसचे रुग्ण सापडले आहेत. मुंढवा येथे देखील एक महिला व त्याच्या मुलाला झिका व्हायरसचे निदान झाले. कोथरूड मध्ये देखील डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिका व्हायरसचे निदान झाले होते. दंडवणे येथील गर्भवती महिलेला झिका अशी लागण झाली आहे.
झिका व्हायरस जीवघेणा आजार नाहीये. ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ, सांधेदुखी अशी लक्षणे, झिका व्हायरस मध्ये दिसून येतात. योग्य उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. याचाच सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिलांच्या बाळांना किंवा गर्भवती महिलांना होऊ शकतो.
एरंडवणे येथे एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणे असलेले त्यांचे कुटुंबीय व इतर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने चेकिंगसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर तसेच पावसाळ्यामध्ये का व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली असून, त्यापासून काळजी घेण्याचे तसेच हा आजार होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी प्रशासनाने नागरिकांना आवाहन देखील केले आहे.