सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प देखील मांडण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात सगळ्यात लक्ष वेधून घेणारी घोषणा होती ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेची सुरुवात एक जुलै म्हणजे आजपासूनच करण्यात आली आहे. ही योजना नक्की काय आहे. त्या योजनेसाठी पात्र असण्यासाठी कोणकोणते निकष राज्य सरकारने ठरवले आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊ.
वय वर्ष 21 ते 60 धर्मांच्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिला जमा झाल्या होत्या. आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रावर महिलांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.
मध्यप्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली आहे. मध्यप्रदेश मध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. योजना किती मोठी आणि लोकप्रिय ठरली होती हे आपल्याला मध्य प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून लक्षात आलेच असेल. महाराष्ट्रात सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी पात्र महिला कोण असू शकतात किंवा त्यासाठीचे निकष कोणते आहे ते जाणून घेऊयात.
१. वय 21 ते 60 वर्षे
२. दरमहा दीड हजार रुपये मिळणार
३. दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार
योजनेसाठी पात्र असण्यासाठी येथील महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्या आणि निराधार महिला देखील आपली नोंदणी करू शकतात. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. साठ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.