काल महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजले. विधानपरिषदेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यात वादावादी झाली. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी विधिमंडळात अपशब्द वापरले. या प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अमावादास दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन केले. यावर गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली असता, देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना बोलू न देता पुढील कामकाज सुरू करण्यात आले. दानवेंच्या अपशब्द या पत्कारावा प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. लाड यांनी दानवेंच्या निलंबनाची व राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे विधिमंडळातील आजचे कामकाज हे वादळी ठरण्याची शक्यता आहे.
प्रसाद लाड यांनी याबद्दल बोलताना अनेक मुरूडयांवर भाष्य केले. यावेळी प्रसाद लाड म्हणाले, ”ज्या प्रकारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचे होते. हे कितपत योग्य आहे याचा दानवेंनी विचार केला पाहिजे. याबद्दल मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे. मी किती शूर आहे हे दाखवायचा प्रयत्न दानवेंनी केला. आम्ही सुद्धा लालबाग-परळला लहानाचे मोठे झाले आहोत.”
या सर्व प्रकरणावर बोलताना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ”बाटगा प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवतो. तो माझा राजीनामा कसा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर अनेक केसेस आहेत. हिंदुत्वासाठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालणारे हिंदुत्ववादी आहेत.