सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरूवात झाली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार प्रस्तावावर बोलत होते. आभार प्रस्तावावर मोदी उत्तर देत होते. मोदी बोलत असताना संसदेत विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना समाज दिली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला. मोदी बोलत असताना विरोधकांनी संसदेत मणिपूर, मणिपूर अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले होते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले, ”काही जणांनी लोकसभा निवडणुकीत अनेक मार्गांचा अवलंब केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो. खोटे बोलून, खोटे पसरवूनदेखील विरोधकांना सत्ता मिळविण्यात यश आले नाही. आमच्या कार्यकाळात २५ कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे.”
आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा कण्र्याची संधी दिल्याबद्दल देशवासीयांची देखील आभार मानले. नेशन फर्स्ट हेच आमचे ध्येय आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे आपल्या भाषणात बोलताना मोदी म्हणाले, ”भ्रष्टाचारबाबत आमच्या सरकारचे झिरो टॉलरन्स असे धोरण आहे. काल आणि आज अनेक खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मत व्यक्त केले आहे. या देशाने तुष्टीकरणाचे राजकारण पहिले आहे. याबाबत शासनाचे मॉडेल देखील जनतेने पाहिले आहे. विकसित भारताचा संकल्प घेऊन आम्ही निघालो आहोत. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित करू.”