सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर सहारा समूहावरील संकटाचे ढग कमी होताना दिसत नाहीयेत . उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील सहारा इंडियाच्या आवारात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. चिटफंड घोटाळा प्रकरणी बुधवारी सकाळी ईडीचे पथक लखनौमध्ये अनेक ठिकाणी पोहोचले आहे. .
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ईडीच्या टीमने सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सहारा इंडियाच्या लखनऊमधील कपूरथला येथील कार्यालयासह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यावेळी कार्यालयाचे गेट बंद करून ईडीचे अधिकारी आतमध्ये कागदपत्रांची तपासणी करत आहेत. ईडीच्या अनेक पथकांनी एकाच वेळी केलेल्या कारवाईमुळे सहारा समूह व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.
छाप्यात सहभागी ईडी टीमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही कारवाई कोलकात्याच्या चिटफंड कंपनीतील घोटाळ्याशी संबंधित आहे.कोलकात्याची चिटफंड कंपनी सहार समूहाशी जोडलेली आहे. घोटाळ्याच्या माध्यमातून जनतेच्या कष्टाच्या पैशाचा अपहार करण्यात आला आहे. ठोस पुरावे मिळविण्यासाठी छापेमारी सुरू आहे. या कारवाईच्या छायेत आणखी अनेक जण येण्याची शक्यता आहे. सध्या सहारा समूहाच्या ठिकाणी कागदपत्रांची छाननी सुरू आहे. छापेमारी सुरू असून ईडीचे पथक आणि ६० ते ७० अधिकारी लखनौमध्ये तळ ठोकून आहेत.
ईडीच्या या कारवाईदरम्यान सहाराच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे