लेह, लडाखमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . भूकंपाची तीव्रता ४.४ एवढी मोजण्यात आली असली तरी या भूकंपात कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही.
https://x.com/ANI/status/1808352477949186253
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले की, आज लेह, लडाखमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. NCS च्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू 36.10 उत्तर अक्षांश, 74.81 रेखांश पूर्वेला होता आणि तो पृथ्वीपासून 150 किलोमीटर खोलीवर होता. बुधवारी सकाळी 8.12 वाजता भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले आणि काही काळ बाहेर थांबले होते. मात्र या भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.