आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदीं उत्तर देत असताना विरोधकांनी कालच्या प्रमाणेच राज्यसभेतही गोंधळ घातला.आज पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाला सुरवात होताच विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे ही आघाडीवर होते.त्यांनी व्हेलमध्ये येऊन मोदींना भाषण थांबण्याची गळ घातली. मात्र या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समजवण्याचा प्रयत्न केला पण अखेर विरोधकांनी सभात्याग केला. या सर्व प्रकारावरून जगदीप धनखड यांनी व्यतित होऊन विरोधकांनी मला पाठ दाखवली नसून संविधानाला पाठ दाखवली आहे,असे म्हणाले आहेत.
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारले,खोट्याचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींवर देश लक्ष ठेवून आहे कारण त्यांच्यात सत्य ऐकण्याची ताकद नाही. ज्यांच्यात सत्याला भिडण्याची आणि या वादविवादांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्याची जिद्द नसते. ते वरिष्ठ सभागृह आणि तिथल्या उदात्त परंपरांचा अपमान करत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हंटले,आणि विरोधकांचा गोंधळ चालू असतानाही जराही विचलित न होता पंतप्रधानांनी आपले भाषण पूर्ण केले.
राज्यसभेचे सभापती धनखड यांनी विरोधकांच्या कृतीचा निषेध केला. त्यांनी विरोधकांच्या वॉकआऊटला संविधानाचा अपमान आणि शपथेचे उल्लंघन म्हटले आहे.
विरोधी सदस्यांनी राज्यघटनेला आव्हान दिले आहे, संविधानाच्या भावनेला विरोध केला आहे आणि त्यांनी घेतलेल्या शपथेचा अवमान केला आहे,असे ते म्हणाले आहेत. तसेच मल्लिकार्जुन खर्गे यांनी वॉकआऊटद्वारे पदाच्या शपथेचा अपमान केला आहे. त्यांनी (विरोधक खासदारांनी) राज्यघटनेची खिल्ली उडवली आहे. मला आशा आहे की ते आत्मपरीक्षण करतील,” असेही धनखड म्हणाले आहेत.
जगदीप धनखड यांनी असेही प्रतिपादन केले की एलओपीला कोणत्याही व्यत्ययाशिवाय बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता.
“मी त्यांना विनंती केली की एलओपीला कोणत्याही व्यत्ययाशिवाय बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. मात्र आज त्यांनी सभागृहाचा अपमान केला नाही तर स्वतःचा आत्मसन्मान सोडला आहे. आज त्यांनी मला त्यांची पाठ दाखवली नाही, त्यांनी ती भारतीय संविधानाला दाखवली. त्यांनी माझा किंवा तुमचा अपमान केला नाही, त्यांनी घेतलेल्या संविधानाच्या शपथेचा अपमान केला आहे “.
विरोधी खासदारांच्या वॉकआऊटचा निषेध करत धनखड म्हणाले की भारतीय राज्यघटनेचा यापेक्षा “मोठा अपमान” असू शकत नाही.
“भारतीय राज्यघटनेचा यापेक्षा मोठा अपमान दुसरा असूच शकत नाही.मी त्यांच्या वर्तनाचा निषेध करतो…त्यांनी भारतीय राज्यघटनेला आव्हान दिले आहे.त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या भावनेचा अपमान केला आहे, शपथेचा अवमान केला आहे.भारतीय राज्यघटना ही तुमच्या हातात धरून ठेवण्यासारखी गोष्ट नाही, ती जीवनपद्धतीचे पुस्तक आहे, मला आशा आहे की ते आत्मपरीक्षण करतील आणि ते कर्तव्याच्या मार्गावर चालतील.अशी अपेक्षा धनखड यांनी व्यक्त केली आहे.