पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यसभेत बोलत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशाच्या जनतेने आमच्या विश्वास दर्शविला आहे. ६० वर्षानंतर असे झाले आहे की एकच सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे. ६० वर्षानंतर घडलेली ही एक असामान्य घटना आहे. अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केले.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांचे मौन आणि बंगालमधील महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले. इतर अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधानांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. तसेच त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचीही माहिती दिली.
राज्यसभेत बोलताना मोदी म्हणाले, “महिलांवरील अत्याचाराबाबत विरोधकांची निवडक वृत्ती अत्यंत चिंताजनक आहे. मी बंगालमधील सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला आहे ज्यात एका महिलेला मारहाण होत आहे. ही घटना संदेशखळीमध्ये घडली आहे. पण विरोधकांनी यावर एक शब्दही काढला नाही.जर ही निवडणूक संविधान वाचवायची असेल, तर देशातील जनतेने त्यासाठी आम्हाला निवडून दिले आहे.”
काँग्रेसने आता ‘भ्रष्टाचार वाचवा’ आंदोलन सुरू केले आहे. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवल्यावर ते गोंधळ घालतात. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे बोलले जात आहे. ‘आप’ भ्रष्टाचार करते, ‘आप’ दारू घोटाळा करते आणि ‘आप’ची काँग्रेसची तक्रार, ‘काँग्रेसने ‘आप’ला घेरले पाहिजे. आता कारवाई झाली तर मोदींना शिव्या द्या. काँग्रेसने पत्रकार परिषदेत ‘आप’च्या विरोधात तथ्ये मांडली होती, आता ती तथ्ये बरोबर होती की नाही हे त्यांनाच सांगावे लागेल.”
हिंदू धर्मावरील वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींनाही धारेवर धरले. हिंदूंना दोष देण्यासाठी खोटे षडयंत्र रचले जात आहे ही गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, सभागृहात देवी-देवतांची चित्रे दाखवण्यात आली. जे दिसतात ते दाखवले जात नाहीत. हा अपमान हा योगायोग आहे की मोठ्या प्रयोगाची तयारी आहे याचा विचार आता हिंदू समाजाला करावा लागेल.