सध्या महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री ताठ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी ५० टक्के असणारी शिष्यवृत्ती वाढवून १०० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. सर्व विद्यार्थ्यांना गणेश दिला जाणार आहे असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. ते विधानपरिषदेवत बोलत होते.
सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, ” मुख्यमंत्र्यानी काही योजना देखील घोषित केल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडविली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. तसेच आपले महाराष्ट्र राज्य गेले दोन वर्षे गुंतवणुकीत प्रथम क्रमकांवर आहे. राज्यसरकारने अर्थव्यवस्थेचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणात केला आहे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”राज्यातील कृषिपंपांना यापुढे वीज बिल माफ केले जाणार आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही. खोटा नॅरेटिव्ह पसरवणे आता बंद केले पाहिजे. राज्यात ४७ लाख कृषिपंप आहेत. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी काही ठिकाणी वीज बिल माफ करण्यात आले आहे. ” दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी बोलताना पोलीस भरती, पुण्याच्या पाण्याचे नियोजन, वीज बिल , उदयोगधंदे, मीटर अशा अनेक मुद्द्यांवर विधानपरिषदेत बोलताना भाष्य केले.