युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. “स्वामी विवेकानंदांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आदरांजली वाहतो. त्यांची शिकवण लाखो लोकांना बळ देते. त्यांचे प्रगल्भ ज्ञान आणि ज्ञानाचा सतत शोध घेणारी वृत्ती आज देखील खूप प्रेरणादायी आहे. त्यांचे समृद्ध आणि प्रगतीशील समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. चला आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूयात .” असे पंतप्रधान आपल्या एक्स वरच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षानेही त्यांना आदरांजली वाहिली आहे. भाजपने स्वामी विवेकानंदांचे ‘संग्राम जितका कठीण, तितका विजय तितका गौरवशाली’ हा महत्त्वाचा कोट एक्स-हँडलमध्ये उद्धृत केला आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार कालातीत आहेत. त्यांचे मुख्य विचार खालीलप्रमाणे आहेत –
‘तुम्हाला जे वाटते, तेच तुम्ही व्हाल’. जर तुम्ही स्वतःला दुर्बल समजाल तर तुम्ही दुर्बल व्हाल आणि जर तुम्ही स्वतःला बलवान समजाल तर तुम्ही बलवान व्हाल. ‘एखाद्या दिवशी तुम्हाला कोणतीही अडचण आली नाही, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात याची खात्री बाळगा.
‘ ‘जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिका. अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे. ‘मी करू शकत नाही’ असे कधीही म्हणू नका, कारण तुम्ही अनंत आहात.’ ‘उठा , जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.’
‘लोक तुमची स्तुती करतात किंवा टीका करत असले तरीही तुमची उद्दिष्टे तुमच्यासाठी दयाळू असोत किंवा नसोत, तुमचा आज मृत्यू असो वा भविष्यात कधीही , मात्र तुम्ही कधीही न्यायाच्या मार्गापासून दूर जाऊ नका.’
असे त्यांचे अनेक प्रेरणादायी विचार समाजाला आणि विशेषतः तरुणाईला आजही प्रेरित करत आहेत आणि अनंत काळापर्यंत प्रेरित करत राहतील.