ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची (लेबर पार्टी) विजयाकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. त्याचवेळी विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak) यांचा पक्ष (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) पराभवाच्या मार्गावर आहे. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्षाची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलने मजूर पक्षाच्या सर्वात मोठ्या विजयाचे संकेत दिले आहेत.
कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या लेबर पक्षाने 174 जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त अठ्ठावीस जागा मिळाल्या आहेत. एकूण 650 जागांपैकी आतापर्यंत 233 जागा जाहीर झाल्या आहेत. गार्डियनच्या अहवालानुसार एकूण बहुमतासाठी 326 जागांची आवश्यकता आहे एक्झिट पोलनुसार लेबर पार्टीला 410 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जात आहे.
सर कीर स्टार्मर यांनी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानले आहेत. 2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा विजय झाला होता आणि डेव्हिड कॅमेरून पंतप्रधान झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर कंझर्वेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
तर लहान विरोधी लिबरल डेमोक्रॅट्सना 61 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्कॉटिश नॅशनल पार्टी 10 जागांसह तिसरा सर्वात मोठा पक्ष बनलेला दिसून आला आहे.