29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ काल भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले . कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी विश्वचषक जिंकून भारताची मान जगात उंचावली आहे. यामध्ये सर्वच खेळाडूंनी दिलेला आपला सहभाग अतुलनीय आहे.
सध्या मुंबईत महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज भेट घेणार आहेत.
दरम्यान आज दुपारी ४ वाजता विधानभवनात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह शिवम दुबे, सूर्यकुमार यादव और यशस्वी जैस्वाल यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभा अध्यक्षांना त्या संदर्भात विनंती केली होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यास मान्यता दिली आहे . कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चारही खेळाडूंनी प्रताप सरनाईक यांचं आमंत्रण स्वीकारले आहे.
याशिवाय या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया काल मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पोचली होती. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघाली त्यानंतर वानखेडे स्टेडियम जगज्जेत्या खेळांडूचा भव्य सत्कार करण्यात आला आहे.