झारखंडची राजधानी रांची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय स्तरावरची प्रांतीय प्रचार सभा यावर्षी १२ ते १४ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली आहे.
संघाच्या अखिल भारतीय स्तरावरील मे आणि जून महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गाच्या जवळपास दोन महिन्यांच्या मालिकेनंतर या बैठकीला देशभरातील सर्व प्रांत प्रचारक उपस्थित राहणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुखांनी सांगितले आहे. . संघाच्या संघटना आराखड्यात एकूण 46 प्रांतांची निर्मिती करण्यात आली आहे. बैठकीत संघाच्या प्रशिक्षण वर्गाचा अहवाल व आढावा, आगामी वर्षातील योजनेची अंमलबजावणी, संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचा २०२४-२५ या वर्षातिल प्रवास दौरे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
संघ 2025 मध्ये आपल्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण करत आहे. या बैठकीत संघ शताब्दी वर्षातील (2025-26) उपक्रमांवर विचारांची देवाणघेवाण केली जाईल. प्रांत प्रचारकांच्या या बैठकीत संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल जी, सी.आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार आणि अतुल लिमये आणि कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. सरसंघचालक डॉ. भागवत ८ जुलैलाच रांचीला पोहोचणार आहेत. प्रांत प्रचारकांच्या बैठकीपूर्वी केंद्रीय स्तरावरील गटाची बैठक होणार आहे.