मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव (Mohan Yadav) यांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रामनिवास रावत (Ramniwas Rawat) यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी आज सकाळी राजभवनात एका संक्षिप्त कार्यक्रमात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. त्यामुळे आता डॉ. मोहन यादव सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 31 मंत्री असणार आहेत.
रावत यांनी 68 दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
रामनिवास रावत यांना कॅबिनेट मंत्री करण्याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून रामनिवास रावत यांच्या अनुभवाचा फायदा होईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा तेथील सरकार आणि जनतेला होईल. तसेचज मागासलेल्या आणि विकासाची अपेक्षा असलेल्या भागातून ते प्रतिनिधित्व करणार आहेत.असे सांगितले.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले. आठ दिवसांनंतर, 11 डिसेंबर रोजी डॉ. मोहन यादव आणि दोन उपमुख्यमंत्री, राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली. दोन दिवसांनंतर, 13 डिसेंबरला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर, 12 दिवसांनंतर, 25 डिसेंबरला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये 28 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 18 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. आता रामनिवास रावत यांच्यासह मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या 11 झाली आहे.
कोण आहेत रामनिवास रावत?
रामनिवास रावत हे श्योपूरच्या विजयपूर मतदारसंघातून सहा वेळा आमदार आहेत. उमंग सिंघार यांना विरोधी पक्षनेते करण्यात आल्याने ते नाराज होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 30 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि भाजप संघ प्रमुख नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत श्योपूर येथे एका निवडणूक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.