Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत उद्यापासून होणार NATO शिखर परिषद; युक्रेनबाबत सर्व देश मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jul 8, 2024, 03:16 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून नाटो शिखर परिषद सुरू होत आहे. यजमान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सर्व 32 नाटो भागीदार देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करतील. या परिषदेत अमेरिका युक्रेनला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, नाटो देशांचे राष्ट्रप्रमुख देखील युक्रेनला पाठिंबा मजबूत करू शकतात. याशिवाय युरोपीय देशांना लष्करी, राजकीय आणि आर्थिक मदत वाढवण्यासाठी बायडेन अनेक महत्त्वाच्या नव्या घोषणा करू शकतात.

युक्रेनला लष्करी, राजकीय आणि आर्थिक मदत देण्यासाठी या परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या मते, या परिषदेत युरोपियन युनियन आणि इंडो-पॅसिफिक भागीदारांसोबत अमेरिकेचे सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

10 जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष बिडेन 32 नाटो सहयोगी देशांच्या बैठकीत सर्वात नवीन सदस्य म्हणून स्वीडनचे स्वागत करतील. मार्च 2024 मध्ये स्वीडनचा नाटोचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यानंतर संध्याकाळी बायडन व्हाईट हाऊसमध्ये सर्व नाटो नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित करतील. 11 जुलै रोजी, NATO युरोपियन युनियन (EU) आणि इंडो-पॅसिफिक भागीदार ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड यांच्यासोबत एक बैठक घेणार आहे. या शिखर परिषदेत NATO च्या स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देखील साजरा केला जाईल, जी आता 32 देशांची मजबूत लष्करी युती आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला पण युद्ध थांबत नाही. अमेरिकेने थेट युक्रेनला नाटोमध्ये सामील होऊ नका असे सांगितले आहे. पण युक्रेन रशियापुढे झुकायला तयार नाही. युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांना रशियानेही इशारा दिला आहे. त्याच वेळी, नाटो देश पूर्णपणे युक्रेनच्या पाठीशी उभे आहेत आणि आता नाटोच्या बैठकीत युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत करण्याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

NATO म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची स्थापना 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि फ्रान्ससह 12 देशांनी केली होती. नाटोचे युरोप आणि उत्तर अमेरिकेत 32 सदस्य आहेत, ज्यात ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि तुर्की यांचा समावेश आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर, अल्बानिया, बल्गेरिया, हंगेरी, पोलंड, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, रोमानिया, लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनियासह अनेक पूर्व युरोपीय देश सामील झाले. फिनलंड मे २०२२ मध्ये त्याचा सदस्य झाला. स्वीडननेही मार्च २०२४ मध्ये नाटोचे सदस्यत्व घेतले आहे.

Tags: genral newsjo baidennatoSLIDERukraineusa
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.