मुंबईत कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण संचालनावर परिणाम झाला. मुंबईत मुसळधार पावसाच्या परिणाम वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्यावर झाला, तसेच काही भागांमध्ये पाणी साठलेले दिसून आले.
एका निवेदनात, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून असे जाहीर करण्यात आले आहे की, “आज मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पहाटे 2:22 ते पहाटे 3:40 पर्यंत धावपट्टीचे कामकाज थांबवण्यात आले. 27 फ्लाइट डायव्हर्स्ट झाल्याची नोंद झाली. उड्डाणे अहमदाबादकडे वळवण्यात आली. हैद्राबाद, इंदूर इ. सध्या, आगमनांना, निर्गमनांना विलंब होत आहे. तसे काही विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत ” .
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सांगितले की, कुलाबा येथे 83. 8 मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि सांताक्रूझमध्ये 267.9 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे. मुंबई शहरात एकूण 2547 मिमी पाऊस पडला, जो याच कालावधीत सरासरी वार्षिक पावसाच्या 27. टक्के आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि आजच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
बीएमसीने सांगितले की, पूर्व उपनगरात घराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या २५ तासांत फांद्या पडल्याच्या ३९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पावसामुळे झालेल्या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.