जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेल्यानंतर, ब्रिगेडियर पृथ्वीराज चौहान, यांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून हा हिजबुल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी मोठा धक्का असल्याचे म्हंटले आहे.
चौहान यांनी असेही नमूद केले की, ऑपरेशन दरम्यान लष्कराच्या एका जवानानेही बलिदान दिले. “कुलगाम मधल्या चिन्निगाम ऑपरेशनमध्ये आमचे सैनिक प्रभाकर प्रवीण यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. आम्ही अनेक दिवस सर्व एजन्सी आणि लष्कराच्या निगराणी उपकरणांच्या मदतीने या भागातील हालचालींवर लक्ष ठेवून होतो. ६ जुलै रोजी आम्हाला दहशतवादी हालचालींची माहिती मिळाली. चिन्निगाम परिसरात आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, या ऑपरेशनमध्ये सुमारे 6 किलो वजनाचा आयईडी मारला गेला निष्प्रभ करण्यात आला आहे.
कुलगाम चकमकीवर बोलताना दक्षिण काश्मीरचे डीआयजी जावेद अहमद माटू यांनी सांगितले की, 6 ते 7 जुलै दरम्यान केलेल्या दोन संयुक्त ऑपरेशनमध्ये एकूण दोन दहशतवादी मारले गेले.
“आदिल, ज्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक एफआयआर आहेत, तो एका कारवाईत मारला गेला. विशिष्ट माहितीच्या आधारे दुसरी चकमक चिन्निगाम परिसरात झाली, ज्यात चार दहशतवादी ठार झाले. त्यांची नावे बशीर दार, तौहीद अहमद शकील अहमद आणि जहीर अहमद दार अशी आहेत. या चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी लपण्याचे ठिकाण होते ज्याचा अतिरेकी बराच काळ वापर करत होते,”
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत शहीद झालेल्या दोन जवानांना भारतीय लष्कराने रविवारी श्रद्धांजली वाहिली.
“चिनार कॉर्प्स कमांडर, जम्मू-कश्मीरचे मुख्य सचिव, डीजीपी जम्मू-कश्मीर, आणि इतर मान्यवर आणि सर्व श्रेणींनी 06 जुलै 2024 रोजी कुलगाममध्ये कर्तव्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या लान्स नाईक परदीप कुमार आणि शिपाई प्रवीण जंजाल प्रभाकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.” असे भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने रविवारी एक्सवर पोस्ट केले आहे.
मादेरगाम गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये पहिली चकमक झाली. काही तासांनंतर जिल्ह्यातील चिन्निगम भागात आणखी एक चकमक झाली होती.