आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) सकाळी 10.55 वाजता नवी दिल्लीहून मॉस्कोला रवाना झाले. पंतप्रधान आजपासून तीन दिवस रशिया आणि ऑस्ट्रियाच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पोहोचले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर पोहोचले आहेत. मॉस्को विमानतळावर रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
रशियाच्या राष्ट्रगीताला पंतप्रधान मोदी उभे राहिले होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींसाठी खाजगी डिनरचे आयोजन केले आहे. येथे पंतप्रधान रशियाच्या राष्ट्रपतींसोबत 22 व्या रशिया-भारत वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चाही अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदी 8 आणि 9 जुलै रोजी मॉस्कोमध्ये असतील. दोन्ही नेते दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील.
भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या प्रसिद्धीमध्ये सामायिक केलेल्या माहितीनुसार, यानंतर पंतप्रधान ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत. ते 9 आणि 10 जुलै रोजी ऑस्ट्रियामध्ये असतील. 41 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतील आणि ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांच्याशी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी आणि नेहमर भारत आणि ऑस्ट्रियातील उद्योगपतींनाही संबोधित करतील. पंतप्रधान मॉस्कोसह व्हिएन्नामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांशीही चर्चा करतील.
रशियामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. विशेषत: संरक्षण करारावर जगाची नजर असेल. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी तिसऱ्यांदा रशियाला जात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीवर चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी मॉस्कोला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, हेही महत्त्वाचे आहे.
रशियाचे अध्यक्षीय प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को दौऱ्यासाठी रशिया उत्सुक आहे. रशियाने ही भेट परस्पर संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार पंतप्रधान आज सकाळी १०.५५ वाजता नवी दिल्लीहून मॉस्कोला रवाना होतील. त्यांचे विशेष विमान 5:20 वाजता Vnukovo-II विमानतळावर उतरेल. रात्री 9.30 ते 11.30 या वेळेत त्यांची पुतिन यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी दोन्ही नेते डिनरला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी 9 जुलै रोजी भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. इतर बैठकाही होणार आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी मॉस्कोहून ऑस्ट्रियाला रवाना होतील. ते 10 जुलैपर्यंत ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर असतील.