Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

धक्कादायक बातमी ! वरळी‘हिट अँड रन’ प्रकरणात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचे उघड

पुण्यातील पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 9, 2024, 02:49 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुण्यातील पोर्शे ‘हिट अँड रन’ प्रकरणात संपूर्ण कुटुंबाचा असलेला सहभाग उघड झाला होता, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण शाह कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवून चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली होती. त्याचप्रमाणे मुंबईतील वरळी येथे नुकत्याच झालेल्या घटनेत, शिवसेना नेत्याच्या मुलाने मिहीर शाह याने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला ध़डक दिली, त्यात महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती गंभीर जखमी आहेत.

शिवसेना नेते राजन शाह यांचा मुलगा असलेला आरोपी मिहीर शाह तेव्हापासून फरार असून ४८ तासानंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान पुणे पोर्शे अपघात प्रकरणात जसा संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचे उघड झाले होते, तसाच वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातातील मुख्य आरोपी फरार असला तरी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हरला अटक केली. अपघातानंतर पळून जा, अपघाताचे खापर ड्रायव्हरवर फोडू असा सल्ला राजेश यांनी मुलाला दिल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे त्याचे वडील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र आता संपूर्ण शाह कुटुंबच यात दोषी ठरण्याची शक्यत आहे. पुणे पोर्श प्रकरणात ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग हा गुन्ह्यात निदर्शनास आला. तसाच काहीसा प्रकार वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणात समोर आला आहे. याची पार्श्वभुमी अशी की रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्या, त्यानंतर मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचे घर गाठले.

मात्र तिथे जाण्यापूर्वी त्याने तिला ३० पेक्षा जास्त वेळा फोन केला. अखेर गर्लफ्रेंडचे घर गाठल्यावर त्याने तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तो तेथेच दोन तास झोपला. घडलेली सगळी घटना कळल्यावर गर्लफ्रेंडने मिहीरच्या घरी फोन करून तो आपल्या घरी आल्याचे सांगितले. ते कळताच मिहीरच्या बहिणीने मैत्रीणीचे घर गाठले. त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवली येथील घरी गेली. तिथे जाताचअवघ्या काही वेळांतच घराला कुलूप लावून आरोपी मिहिर, आई आणि बहिणीसह पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आता पोलिस याप्रकरणी मिहिरची आई व बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान हा तपास सुरू असातनाच मिहीरचा मोबाइलही पश्चिम द्रूतगतीमार्गावर कांदिवली-बोरिवली दरम्यान बंद केल्याचे समोर आले असून तेच त्याचे शेवटचे लोकेशन होते असे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहिरच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवला आहे.

रविवारी पहाटे वरळीच्या ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला. त्यानंतर महिरीने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्याला आधी ड्रायव्हिंग सीटवरून उठून शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले. तसेच या अपघाताचा आरोप ड्रायव्हरच्या डोक्यावर टाकण्याचाही त्यांचा प्लान होता. त्याप्रमाणे त्यांनी मुलाला सल्ला दिला असे समजते. तसेच ज्या बीएमडब्ल्यूने हा अपघात झाला तीच मुख्य पुरावा असल्याने ती गाडीच नष्ट करण्याची योजनाही राजेश शाह यांनी आली होती, असेही चौकशीतून समोर आले आहे. ज्यामुळे मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.

पहाटे झालेल्या अपघातानंतर आरोपी मिहिरने घटनास्थळावरून पळ काढला. पश्चिमद्रूतगती मार्गे तो पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडली. त्यामुळे त्याने ती गाडी वांद्रे कलानगर येथे सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिहिरने वडिलांना दिली. त्यानंतर मिहिरचे वडिल राजेश शहा कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी राजेश शाह यांनी गाडीवरील पक्षाचे चिन्ह व नंबरब्लेट काढून बदलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एवढंच नव्हे तर ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅनलाही पाचरण करण्यात आले होते. या अपघातात गाडी हाच मुख्य पुरावा असल्याने ती गाडी अज्ञात स्थळी लपवण्याता आरोपींचा डाव असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र तेवढ्यात पोलिस तेथे आल्याने राजेश यांचा प्लान फसला.

या अपघातास जबाबदार असलेला मुख्य आरोपी मिहीर शाह हा सध्या फरार आहे.याप्रकरणी पोलिसांनी राजेश शाह यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. मात्र काल त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. याच राजेश शहा यांना सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ४८ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना अद्याप त्याचा शोध लागलेला नसून त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तो परराज्यात किंवा परदेशात पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

Tags: mihir shahpune porshe car accidentshivsena leader rajesh shahaTOP NEWSworli hit and run case
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.