देशातील 7 राज्यांमधील 13 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. विद्यमान सदस्यांचे निधन किंवा राजीनामा यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी १४ जून रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या पोटनिवडणुकीत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांचे भवितव्य पणाला लागले आहे. पश्चिम बंगालमधील बागडा आणि माणिकतला,रायगंज, राणाघाट दक्षिण, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, पश्चिम पंजाबचे जालंधर, हिमाचल प्रदेशचे देहरा, हमीरपूर आणि नालागढ, बिहारमधील रुपौली, तामिळनाडूच्या विक्रवंडी आणि अमरवाडा विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत.
१३ जागांपैकी बंगालमधल्या ३ जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. तर इतर पक्षांनी ८ आणि काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. यावेळी लोकसभेमध्ये मिळालेल्या बहुमताच्या जोरावर भाजप याही विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताचा दावा करत आहे. आजच्या निवडणुकीसाठी 13 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच १२ हजार फूट उंचीवर वसलेल्या उत्तराखंडमधल्या बद्रीनाथच्या गावांमध्ये ईव्हीएमवर मतदान केले जाणार आहे.