Unnao Road Accident : लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर बुधवारी दुधाच्या कंटेनरवर डबल डेकर बस आदळल्याने 18 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उन्नावमधील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.तर जखमींना रु. 50,000.ची मदत करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. “उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर झालेल्या रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे”, असे राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत निवेदनात ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.राष्ट्रपतींनी या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. “अशा आकस्मिक मृत्यूचे बळी ठरलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करते. आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होवोत,” असे मुर्मू यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उन्नावचे जिल्हा दंडाधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले की, पहाटे 5:15 च्या सुमारास बस कंटेनरला धडकली, ज्यामध्ये एकूण 57 प्रवासी होते.
दुधाच्या कंटेनरला धडकल्याने 18 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. उन्नाव जिल्हा दंडाधिकारी पुढे म्हणाले की सुमारे 20 लोक सुरक्षित आहेत आणि त्यांना दिल्लीला पाठवले जात आहे.