Wimbledon 2024 :डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) आणि कार्लोस अल्कारेज (Carlos Alcaraz) यांनी आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. आता दोघेही विम्बल्डनमध्ये टेनिससाठी सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. गतवर्षी अल्कारेज याने या स्पर्धेतील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने जिंकले होते.
परंतु पुढील पाच सामन्यांमध्ये सिन्नरने बाजी मारली होती. मात्र, मेदवेदेवने पुन्हा एकदा विम्बल्डनमध्ये दमदार पुनरागमन केले आणि सिन्नरचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मंगळवारी मेदवेदेव मात्र गडबडताना दिसला, पण नंतर त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत 6-7(7), 6-4, 7-6(4), 2-6, 6-3 असा विजय मिळवला आणि पुढे दुसरी विम्बल्डन उपांत्य फेरीसाठी तो स्वतःचे स्थान नक्की करताना दिसून आला.
उपांत्य फेरीत मेदवेदेवचा सामना गतविजेता कार्लोस अल्काराजशी होईल, ज्याने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा ५-७, ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला.
मॅचनंतर मेदवेदेव म्हणाला, “जर तुम्हाला सिनरला हरवायचे असेल, तर तो एक कठीण सामना असेल. तो आता असा खेळाडू राहिलेला नाही ज्याला सहज पराभूत करता येईल. पण मी त्याच्याशी अटीतटीचा सामना खेळू शकलो याचा मला आनंद आहे”.