गेले काही दिवस महाराष्ट्रात सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणात पश्चिम महाराष्ट्रात तसेच सातारा पुणे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति ते अति मुसळधार पाऊस देखील कोसळत आहे. दरम्यान हवामान विभागाकडून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांसाठी पुढील 36 तास महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे अंधेरी सब वे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्याची माहिती समोर येते त्यामुळे अंधेरी सब वे बंद करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखलभागात पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर ही झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरला देखील आज पावसाचा येलो अलट जारी करण्यात आलाय.
राज्यातील अनेक ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सातारा, कोल्हापूर आणि अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. जालना, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पावसाने दडी मारलेली आहे. पूर्व विदर्भ , मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी हवा तास पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. भंडारा सशर्त देखील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.