काल महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान काल झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीच्या ८ उमेदवारांचा पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजय झाला आहे. तर सदाभाऊ खोत यांना दुसर्यापसंतीची मते मिळाली आणि त्यात ते विजय झाले आहेत. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाष्य केले आहे.
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातले धुरंदर आणि खरे चाणक्य असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. फडणवीसांनी अनेकांनी घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांचा अभिमानी होऊ दिला नाही आणि कधीही होऊन देणार नाही असे खोत म्हणाले आहेत.
भारतीय जनता पक्ष हा ग्रामीण भागात काम करणारा, गावगाड्यात काम करणारा पक्ष आहे. पक्षाने गावगाड्यात काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि त्याला जिंकवून दिले. आमच्या सर्व जागा जिंकून आल्या. जनतेला चांगले आणि वाईट काय ते कळते असे खोत म्हणाले.
महायुतीमध्ये भाजपाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. तसेच काँग्रेसची देखील काही मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत.
पंकजा मुंडे
सदाभाऊ खोत
परिणय फुके
अमित गोरखे
योगेश टिळेकर
शिवाजीराव गर्जे
राजेश विटेकर
भावना गवळी
कृपाल तुमाने
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
प्रज्ञा सातव
मिलिंद नार्वेकर
पराभूत उमेदवार (महाविकास आघाडी)
जयंत पाटील (शेकाप)