पंढरपुरात सध्या वारीचा उत्साह पाहायला मिळत आहे. लाखो वारकरी राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून माउली, माउली गजर करत पंढरपूरकडे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत. १७ जुलै रोजी आषाढी वारी आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूर कडे चालले आहेत. ऊन, वारा आणि पाऊस याची पर्वा न वारकरी केवळ माऊलीचा जयघोष करत आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रयाण करत आहेत. वारकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहेत. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात देऊ केला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचे मुख्यालय हे पंढपुरातच असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये वारकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतून वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जाणार आहे. त्याप्रमाणेच वारकर्यांना पेन्शन लागू केली जाणार आहे. तसेच पंढरपूरच्या विकासाला चालना दिली जाणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. आषाढी एकादशीच्या निमित्त पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्र्यानी घेतला. याचवेळेस मुख्यमंत्र्यानी करी महामंडळाच्या आदेशाची प्रत वारकऱ्यांकडे सुपूर्त केली आहे.