प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे आता दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात पोहचले आहेत. या प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल पाठवण्याचे आदेश पीएमओने दिले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा होत आहे. ती आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी असतांना त्यांचे विविध कारनामे चांगलेच चर्चेत आले. तेथील जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण बाहेर येत आहे. दररोज नवनवे खुलासे आणि प्रकरण पूजा खेडकर यांच्या संदर्भात बाहेर येत आहेत. पुणे येथे प्रक्षिणार्थी अधिकारी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यांचे हे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. तक्रारीनंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. मात्र त्यांची दररोजच चर्चा सुरू आहे. आता त्यांचे कारनामे थेट दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात पोहचले आहेत.
वेगवेगळ्या प्रकारे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या सर्व प्रकरणाची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासले जाण्याची शक्यता आहे.