जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दार्जिलिंगचे लाल ब्रजेश थापा शहीद झाल्याच्या वृत्तामुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.मात्र त्यांचे कर्नल भुवनेश थापा यांनी आपल्या मुलाने देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी काहीतरी केले याबाबत अभिमान व्यक्त केला आहे.ते म्हणाले की, “लहानपणापासूनच त्याला नेहमीच भारतीय सैन्यात राहायचे होते. तो माझा आर्मीचा पोशाख घालून फिरायचा. इंजिनिअरिंग केल्यानंतरही तो. मला म्हणाला होता की मला अजूनही सैन्यात जाण्याची इच्छा आहे आणि मला सैन्यात प्रवेश मिळाला आहे असे त्याने आम्हाला सांगितले होते”.
27 वर्षीय लाल ब्रजेश थापा यांचा जन्म दार्जिलिंगमधील लेबोंग येथे झाला. लेबोंगमधील वडिलोपार्जित घराव्यतिरिक्त त्यांचे सिलीगुडी येथेही घर आहे. त्यांचे वडील भुवनेश कुमार थापा सैन्यात कार्यरत होते.ब्रिजेशने उच्च शिक्षण मुंबईत पूर्ण केले आणि तेथून त्यांनी बी.टेक केले .मात्र, लहानपणापासूनच वडिलांप्रमाणे लष्करात शिपाई होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. ब्रिजेश 2019 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यानंतर पहिली पोस्टिंग भारतीय लष्कराच्या 145 आर्मी एअर डिफेन्समध्ये झाली होती.
त्यानंतर त्यांची अतिरिक्त रेजिमेंटल ड्युटीसाठी जम्मू आणि काश्मीरच्या डोडा येथील 10 राष्ट्रीय रायफल्समध्ये बदली करण्यात आली.ब्रजेश गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिथे गेले होते ते या महिन्यात परत येणार होते.ब्रजेशचे पार्थिव मंगळवारी विशेष विमानाने सिलिगुडीतील बागडोगरा विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी त्यांना दार्जिलिंगमधील त्यांच्या वडिलोपार्जित गाव लेबोंग येथे नेले जाईल.जिथे सैनिकांसाठीच्या शासकीय त्यांच्यावर इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
देशासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या मुलाचा अभिमान आहे, असे कॅप्टन थापाची आई निलिमा थापा म्हणाल्या आहेत. “तो आमच्याकडे परत येणार नाही. रात्री 11 वाजता आम्हाला बातमी मिळाली. तो खूप सभ्य माणूस होता. त्याला नेहमी आर्मीमध्ये जॉईन व्हायचं होते . आम्ही त्याला नेहमी सांगायचो की आर्मीमधलं आयुष्य खडतर आहे. पण माझ्या मुलाने ते सहजपणे स्वीकारले. मला आज खूप अभिमान आहे. ज्या माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले त्याबद्दल सरकार दहशतवाद्यांवर कारवाई करेल याची आम्हाला खात्री आहे. ”
सोमवारी संध्याकाळी देसा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कॅप्टन ब्रिजेश थापा, नाईक डी राजेश, शिपाई बिजेंद्र आणि शिपाई अजय अशी या कारवाईत शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.