ओमानच्या किनारपट्टीजवळ तेलवाहू जहाज ‘प्रेस्टिज फाल्कन’ हे बुडाले असून १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत.
जहाज कोसळल्याचे ठिकाण ड्यूकम बंदर शहराजवळ, रास मदारकाच्या आग्नेय-पूर्वेला २५ नॉटिकल मैलांवर आहे.या जहाजातील तीन क्रू मेंबर्स श्रीलंकन आहेत. एमएससीच्या पोस्टनुसार, जहाजातील कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी याबाबतची बातमी दिली आहे. . सुरक्षा केंद्राने सांगितले की, प्रेस्टीज फाल्कन नावाचे तेलवाहू जहाज दुबईच्या बंदरावरून निघाले होते. ते ओमानमधील येमेन ऐडन बंदराकडे येत असताना हा अपघात घडला. डुकम या ओमानमधील आणखी एका बंदराजवळ असलेल्या रास मद्राकाच्या शहरापासून आग्नेय दिशेला २५ सागरी मैल अंतरावर हे जहाज बुडाले. दोन दिवसांपासून या जहाजातील कर्मचाऱ्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे.
ड्यूकम बंदर, ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर स्थित, प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या जवळ आहे. हे ओमानचे सर्वात मोठे बंदर आहे.रॉयटर्सने देखील या दुर्घटनेची माहिती दिली आहे. जहाज पाण्यात पलटी झाले असून अद्याप ते स्थिर झालेले नाही. तेल गळतीची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
एलएसईजीच्या शिपिंग माहितीवरून, हे जहाज २००७ मध्ये बांधले गेले होते आणि ११७ मीटर लांबीचे आहे. मुख्यतः कच्च्या तेलाची वाहतूक करणारे हे जहाज टँकर प्रकारातील आहे.या दुर्घटनेनंतर शोधकार्य सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.