जम्मू-काश्मीर मध्ये गेल्या महिन्याभरात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. या भ्याड हल्ल्यांमध्ये महिन्याभरात भारतीय लष्कराचे १२ जवान शहीद झाले आहेत. दरम्यान मणिपूर हिंसाचार आणि जम्मूकाश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. आपले शूर जवान रोज शहीद होत आहे, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अमित शहा त्यांची पूर्ण ताकद आमच्याविरुद्ध लढण्यासाठी लावत आहेत. त्यामुळे दहशतवादी सुटलेत. जम्मू काश्मीर किंवा मणिपूर असो याला अमित शाह जबाबदार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे राऊत म्हणाले. थोडी जरी नैतिकता असेल तर अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे.
काल जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे दहशत्वाद्यानी भायंद हल्ला केला होता. त्यात भारतीय लष्कराचे ४ जवान आणि १ अधिकारी शहीद झाले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे. लष्कराला दहशतवाद्यांचा समान करण्यासाठी पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. या घटनेवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे.
अमित शाह हे अयशस्वी गृहमंत्री आहेत. देशाच्या कायदा सुव्यस्थेकडे त्यांचे लक्ष नाही. देशाच्या सुरक्षेकडे त्यांचे लक्ष नाही. फक्त आपल्या विरोधकांना संपवायचे याकडेच त्यांचे लक्ष आहे. जवानांच्या हत्येला मोदी आणि शहांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.