अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मिडीयावरुन याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी माझे काम सुरु राहील असे बायडेन म्हणाले आहेत.लास वेगास मधील युनिडोस कॉन्फरन्स भाषणापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
जो बायडेन यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षण दिसत आहेत. त्यांना सर्दी आणि खोकला झाला आहे. तसेच त्यांना बराच थकवाही जाणवतो आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर आम्ही त्यांना अँटी व्हायरल डोस पॅक्सलोव्हिड दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांनी सांगितले आहे.
व्हाईट हाऊसने अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे की, “ते डेलावेअरला परत येतील आणि स्वतःला विलगीकरणामध्ये ठेवतील आणि त्या काळात त्यांची सर्व कर्तव्ये पूर्णपणे पार पाडत राहतील.
यूएस राष्ट्राध्यक्ष असलेल्या बायडेन यांचे लसीकरण झाले आहे. तसेच त्यांनी COVID-19 चे सप्टेंबर 2023 मध्ये बुस्टर डोसही घेतलेले आहेत.