जम्मूच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. केरन सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. येथे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आज सकाळी जम्मूच्या डोडा अंतर्गत कास्तीगडमध्येही जवानांनी दहशतवाद्यांशी सामना केला होता. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.
एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाडा जिल्ह्यातील केरन भागात घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या 6RR आणि कुपवाडा पोलिसांसह सुरक्षा दलांसोबत चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू विभागातील डोडापासून 300 किमी अंतरावर असलेल्या कोटी गावातील शिया धार चौंड माता वनक्षेत्रात काल संध्याकाळी ही चकमक झाली. एका लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांनी बलिदान दिले.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. जम्मू काश्मीरला अशांत करण्याचं प्रयत्न केला जात आहे. मात्र आपले शूर जवान दहशतवाद्यांचा प्रत्येक प्रत्येकी प्रयत्न हाणून पाडत आहेत. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू विभागातील डोडापासून 300 किमी अंतरावर असलेल्या कोटी गावातील शिया धार चौंड माता वनक्षेत्रात काल संध्याकाळी ही चकमक झाली.
दहशतवाद्यांच्या या नापाक कृत्याला भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या चकमकीत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही शोधमोहीम सुरू आहे.डोडा येथील देसा वनपरिक्षेत्रातील धारी गोटे उर्बगी येथे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू झाली होती. दरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि घनदाट जंगलात लष्कराच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास पुन्हा जंगलात गोळीबार झाला ज्यात लष्कराच्या अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद झाले.