” तुम्ही आम्हाला या कठीण प्रसंगी पाठिंबा द्याल, या कठीण आणि संवेदनशील अशा प्रसंगी आम्हाला प्रायव्हसी मिळावी, सर्वांनी समजून घ्यावे ” अशी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.
गेले अनेक दिवस त्यांच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर चर्चा चालू होती, मात्र या दोघांनी त्यावर कोणतेही उघड भाष्य करणे टाळले होते.
हार्दिकने 31 मे 2020 रोजी नताशा सोबत लग्न केले होते.या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या पद्धतीने लग्न केले होते. हे सेलिब्रिटी कपल त्यावेळी खूप चर्चेत आले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं 30 जुलै 2020 रोजी अगस्त्य नावाच्या मुलाला जन्म दिला होता. चार वर्षांचे हे नाते आता संपुष्टात आले आहे.
आयपीएल 2024 दरम्यान हार्दिक आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात मतभेद झाले होते. त्यासंदर्भातील बातम्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर येत होत्या. यामुळे नताशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हार्दिकसोबतचा कोणताही फोटो शेअर करत नव्हती. यामुळे दोघांमध्ये सुरळीत काहीच नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात होते.मात्र काल समोर आलेल्या इंस्टाग्राम पोस्टने अखेर सत्य उघड केले आहे.
आता दोघे मिळून मुलगा अगस्त्यची जबाबदारी उचलणार आहे. नताशा घटस्फोटच्या निर्णयानंतर तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली आहे.घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला त्याच्या कमाईतील 70 टक्के रक्कम नताशाला द्यावी लागू शकते.असे सांगितले जात आहे.