केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPAC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 16 मे 2023 रोजी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता. मात्र त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या 5 वर्षे आधीच राजीनामा दिला आहे. UPSC च्या अध्यक्षांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. UPAC चेअरमन यांचा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरचा वाद चर्चेत आहे. मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनोज सोनी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केल्याचे समजते. मात्र, सरकारने अद्याप नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर केलेले नाही.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) टीम चौकशी करणार आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप होता. याबाबतची तक्रार पुणे एसीबी कार्यालयातही करण्यात आली आहे. बुधवारी पुणे एसीबीने खेडकर कुटुंबीयांच्या नावे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या त्रासात सातत्याने वाढ होत आहे. यूपीएससी परीक्षेतील गैरप्रकारांमुळे वादात सापडलेल्या पूजा खेडकरच्या घरावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने खेडेकरांच्या घराबाहेरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. खेडकर कुटुंबाचा बंगला पुण्यातील बाणेर भागात आहे. बंगल्याच्या सुशोभिकरणासाठी फूटपाथवर अतिक्रमण करण्यात आले होते. महापालिकेने यापूर्वी बेकायदा बांधकामे हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र पुणे महापालिकेला कुटुंबाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बुलडोझरद्वारे अतिक्रमण हटवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पूजा खेडकरच्या अपंग प्रमाणपत्राबाबत नवा खुलासा समोर आला आहे. अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी दिलेला पत्ता हा कारखान्याचा पत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड असणे आवश्यक असताना पूजाने रेशनकार्डसाठी अर्ज केला होता आणि तिचे उत्पन्न ५ लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते.