वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी काही केल्या संपत नाहीयेत. त्यांच्याविरुद्ध यूपीएससीने देखील तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता दिल्ली क्राईम ब्रँचने देखील पूजा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी, फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. दरम्यान आज पूजा खेडकर पुणे पोलिसांसमोर हजार होणार असून, त्यांचा जबाब नोंदविला जाण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे आता दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात पोहचले आहेत. या प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल पाठवण्याचे आदेश पीएमओने दिले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा होत आहे. ती आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी असतांना त्यांचे विविध कारनामे चांगलेच चर्चेत आले. तेथील जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण बाहेर येत आहे. दररोज नवनवे खुलासे आणि प्रकरण पूजा खेडकर यांच्या संदर्भात बाहेर येत आहेत. पुणे येथे प्रक्षिणार्थी अधिकारी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यांचे हे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. तक्रारीनंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. मात्र त्यांची दररोजच चर्चा सुरू आहे. आता त्यांचे कारनामे थेट दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात पोहचले आहेत.
पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आता प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीबाबत चौकशी सुरू केली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे दिलीप खेडेकर यांनी बेकायदेशीरित्या मार्गानं करोडोची माया जमवली असल्याचा लाच लुचपतविभागाला संशय आहे. दिलीप खेडेकर यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतरया विभागाने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेण्यासाठी अहवाल मागवला आहे.. आता लाच लुचपत विभागाचा ससेमिरा खेडेकर कुटुंबाच्या पाठीमागे लागल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली दिसत आहे.