Stock Market Update : अर्थसंकल्प 2024 सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात खळबळ उडाली. उद्या 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सातव्यांदा देशाचे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून आले.
सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 500 अंकां घसरला, पण थोड्या वेळात
त्यामध्ये तेजी दिसून आली. सकाळी 10.15 वाजता सेन्सेक्स 70 अंकांनी वधारला. त्याच वेळी, निफ्टी देखील 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला, परंतु निफ्टी देखील आता ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली असली तरी देखील पुन्हा शेअर बाजार रुळावर आला. बीएसई सेन्सेक्सने 80,408.90 वर व्यापार सुरू केला, जो मागील 80,604.65 च्या पातळीपासून 200 अंकांनी घसरला आणि पुढील पाच मिनिटांत तो 500 अंकांनी घसरून 80,103.77 च्या पातळीवर पोहोचला.
सेन्सेक्सप्रमाणेच, NSE निफ्टी देखील लाल चिन्हावर उघडला आणि त्याच्या मागील 24,530.90 च्या बंदच्या तुलनेत, त्याने 24,445.75 च्या स्तरावर व्यवहार करण्यास सुरुवात केली आणि पुढच्या क्षणी तो 147.50 अंकांनी घसरला आणि 24,383.40 च्या खाली पोहोचला. मात्र काही वेळानंतर निफ्टी देखील पुन्हा हिरव्या रंगात आला.
देशाचा अर्थसंकल्प उद्या 23 जुलै 2024 रोजी सादर केला जाईल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या अर्थसंकल्पाकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.
देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील हा वार्षिक अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. दरम्यान, आज सोमवारी सरकार संसदेत देशाचा आर्थिक सर्वेक्षण सादर करणार असून, त्यात देशाच्या आर्थिक आरोग्याचे चित्र मांडले जाणार आहे.