लवकरच आपल्या सर्वांचा आवडता आणि कोकणात विशेष महत्व असणारा गणेशोत्सव सण येणार आहे. लवकरच सर्वांच्या घरी गणरायाचे आगमन होणार आहे. दरम्यान गणेशोत्वासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतात. त्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वेने प्रवास करतात. गणेशोत्सवासाठी मुंबाईपासून कोकणात २०२ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. कालपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. मात्र आरक्षण सुरु झाल्यानंतर केवळ काही मिनिटांतच आरक्षण फुल्ल झाले.
कोकण रेल्वेचे आरक्षण काही मिनिटांमध्येच फुल्ल झाल्याने त्यामध्ये काळाबाजार झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे,. गणेशोत्सव हा कोकणातील लोकांचा आवडता सण. या उस्त्वासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात येत असतात. गणेश चतुर्थीच्या आधी एक ते दोन दिवस कोकणात आपल्या गावी जायचे असा चाकरमान्यांचा शिरस्ता असतो. त्यासाठी ते खासगी वाहने किंवा कोकण रेल्वेचा वापर करतात. यंदा खास गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चारकमान्यांसाठी २०२ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.
२०२२ विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण कालपासून सुरू झाले होते. मात्र काही वेळातच हे आरक्षण पूर्ण झाल्याने याव्यवस्थेत काळाबाजार झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे प्रवाशानी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये असा काही काळाबाजार झाला असल्यास कारवाईची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.