Budget 2024 PM Awas Yojna : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 23 जुलै रोजी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान आवास योजनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या योजनेसंबंधित अर्थमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागात अतिरिक्त 3 कोटी घरं बांधण्यात येतील. त्यासाठी गरजेची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी संसदेत दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांवर केंद्रित आहे. तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांचे लक्ष सर्वसामान्यांवर आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शहरी गृहनिर्माण योजनेसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आणि 3 कोटी घरे बांधण्याचीही चर्चा आहे.
प्रधानमंत्री आवास विकास योजना (PMAY) ही एक सरकारी योजना आहे जी भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा गरीब लोकांना घरे बांधणे हे या योजनेचे ध्येय आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही लोकांना मिळतो.