संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये देशातील विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यानी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प २०४७ च्या भारताच्या विकासाचा पाया असणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या अर्थसंकल्पामध्ये गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अनेक नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी १० लाखांचे जार्ज मिळणार आहे. दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर देण्यात येणार आहेत. याबद्दलची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.