Union Budget 2024-2025 Income Tax Slab : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये नव्या कर प्रणालीत (Income Tax) स्टँडर्ड डिडक्शन हे ५० हजारांवरुन ७५ हजार करण्यात आलं आहे.
याशिवाय आयकर स्लॅबमध्येही बदल करण्यात आला. आता 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के, 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के, 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर लागणार आहे.
इन्कम टॅक्स स्लॅब बदलाचा किती फायदा झाला?
लक्षात घ्या की, आयकर स्लॅबमध्ये जे बदल झाले आहेत ते नवीन कर प्रणालीसाठी आहेत. जुन्या करप्रणालीत फायदा होणार नाही. आता प्रश्न असा आहे की नवीन करप्रणालीमुळे किती फायदा झाला कारण याआधीही 3 लाख रुपयांपर्यंतच्या करांवर शून्य कर दायित्व होते आणि आता नव्या घोषणेनंतरही तेच आहे.
मात्र, यावेळी स्लॅबमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याआधी ३-५ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के कर देय होता, मात्र आता ३ ते ६ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इतका कर भरावा लागणार आहे, म्हणजेच मर्यादा १ लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
यानंतर, पूर्वी 6-9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर होता, परंतु आता 7-10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आहे. पूर्वी 9-10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर आकारला जात होता, परंतु आता त्याची मर्यादा 10-12 लाख रुपये आहे. यानंतर कोणताही बदल झालेला नाही, म्हणजे आधी आणि आता दोन्ही, 12-15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आहे.
जुन्या कर प्रणालीमध्ये कर दर काय आहे?
जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल नाही. 2.5 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. यानंतर 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के, 5-10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर लागेल.