Budget 2024 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला यांच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी तरुणांना मोठी भेट दिली आहे.
यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली की, ज्या तरुणाला पहिली नोकरी मिळेल त्याला केंद्र सरकार 15 हजार रुपये देईल. यासाठी त्याचे EPFO खाते वापरले जाईल. एक लाख रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना ही योजना लागू होईल. यासाठी पात्रता मर्यादा दरमहा एक लाख रुपये पगार असेल. याचा फायदा 2.1 लाख तरुणांना होणार आहे.
शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार
यासोबतच यावर्षी उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी १० लाखांचे कर्ज मिळणार आहे. दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर देण्यात येणार आहेत. याबद्दलची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.