Mega Block : गेल्या आठवडाभरापासून पुण्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गेला आठवडाभर वाहतुकीची कोंडी झाली आहे. तसेच आता मध्य रेल्वे देखील बेजार झाली आहे. मध्य रेल्वेवर सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे विभागातील लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. पावसाने झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असता, आता रेल्वे मेगा ब्लॉकमुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
कधी घेणार मेगाब्लॉक?
पुणे विभागात सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत. दौंड स्थानकावरील विविध कामासाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक मुळे तब्बल 19 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
कोणत्या गाड्यांचे मार्ग बदलले जाणार?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुर्ण-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे रवाना केली जाईल.
बंगळुरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाईल.
लांबच्या गाड्यांनाही फटका
नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे रवाना होईल.
चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे मार्गे धावणार आहे.