कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला पाह्यला मिळतोय. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला देखील बस्तान दिसत आहे. राज्यातील बहुतांश नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस होत आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पाऊस सूरु आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नाडीची पाणी पातळी इशारा पातळीकडून धोका पातळीकडे जाण्यास सुरूवात झाली आहे. पंचगंगा नाडीची पातळी सध्या ४२ फूट २ इंचावर पोहोचली आहे. तर या नदीची पातळी १० इंचाने कमी आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र धरणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणे देखील जवळपास पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. स्वयंचलित दरवाजे असलेले राधानगरी धरणे ९२ टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होऊ शकते.
सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४२ फूट २ इंच इतकी आहे. नदीची धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास कोल्हापुरवर महापुराची संकट ओढवण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहराजवळील कळंब तलाव देखील भरला आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.