कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला पाह्यला मिळतोय. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला देखील बस्तान दिसत आहे. राज्यातील बहुतांश नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. दरम्यान आजही राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातच आता रत्नागिरी सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाबद्दल एक ओठी बातमी समोर येत आहे.
कोकणात आणि घाटमाथ्यावर सध्या अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी घाट इतर रस्ते खचण्याचे किंवा त्यावर पाणी येऊन वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाचा काही भाग खचला आहे. त्यामुळे तब्बल ४० गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे घाटाचा रस्ता खचला आहे. खचलेला भाग हजारो फूट दरीत कोसळला आहे.
रघुवीर घाटातच पावसाळ्यातील मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटक या घाटात येत असतात. रघुवीर घाट हे पर्यटकांचे मोठे आरक्षणाचे स्थळ आहे. मात्र आता घाटरस्ता खचल्याने हा घाट सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. त्याबद्दलचे निवेदन देखील तहसील कार्यालयात देण्यात आले आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट हा महत्वाचा राज्यमार्ग आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.