Pune Weather : गेली दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे पुणे शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत पुण्याचे पालकमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असून, पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.
पुण्यातील ही परिस्थिती पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून मुरलीधर मोहोळ हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्यात येताच मोहोळ पूरग्रस्त भागाचा आढावा घेतील. पुण्यातील संगमवाडी, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, आणि सिंहगड रोड परिसरातील पूरपरिस्थीतीचा त्यांच्याकडून आढावा घेण्यात येईल. तसेच महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षालाही भेट देणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून खडकवासल धरणातील पाणी ५० टक्के पर्यंत सोडण्यात येणार आहे, अशास्थितीत पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे. तसेच नागरिकंना या परिस्थिती घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.