Pune Weather : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावीली आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर, पुणे, कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी काही महत्वाची पाऊले उचली आहेत, तसेच महत्वाचे निर्देश देखील
दिले आहेत.
-मुंबई, पुणे, रायगड परिसरात अतिवृष्टी सुरु आहे, जिल्हा, महानगरपालिका प्रशासन सज्ज; संबंधित अधिकारी व कर्मचारी फिल्डवर तैनात.
-ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु.
-एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणांनी समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश.
-नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन.
-पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित ठकाणी हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश.
-एखाद्या ठिकाणी लोक अडकले असल्यास त्यांना हेलीकॉप्टरने कसे वाचवता येईल हे पाहण्याचे निर्देश.
-मुंबईत 255 पंप सुरु असून याद्वारे कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु.
-मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश.
-पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.