दोन अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झालेले आपण पाहिले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार महाविकास आघाडीच्या सत्तेतुन बाहेर पडून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेले कायदेशीर प्रक्रिया आणि नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय व निवडणूक आयोगाचा निर्णय अप पहिलाच आहे. दरम्यान आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नरेवकरांनी आपला निर्णय देत असताना दोन्ही गटाकडे आमदारांना पात्र ठरवले होते. यानिर्णयाविरोधातच भारत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याबाबतची सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. यानंतर राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्वाचा निकाल दिला. या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. तसेच शिंदे गटाचे व ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले होते.