Paris Olympics Indian Match Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णासह एकूण 7 पदके जिंकली होती. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू 16 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत, ज्यांना दुहेरी आकडी पदके जिंकून इतिहास रचायचा आहे.
२६ जुलैपासून सुरु झालेली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत चालेल. या कालावधीत 200 हून अधिक देश सहभागी होत आहेत. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊया…
भारताच्या खेळाडूंचं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं वेळापत्रक
तिरंदाजी 25 जुलै ते 04 ऑगस्ट
ॲथलेटिक्स 01 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट
बॅडमिंटन 27 जुलै ते 5 ऑगस्ट
बॉक्सिंग 27 जुलै ते 10 ऑगस्ट
घोडेस्वारी 30 जुलै ते 4 ऑगस्ट
गोल्फ 01 ऑगस्ट ते 01 ऑगस्ट
हॉकी 27 जुलै ते 8 ऑगस्ट
जुडो 2 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट
रोइंग 27 जुलै ते 3 ऑगस्ट
सेलिंग 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट
शूटिंग 27 जुलै ते 5 ऑगस्ट
स्विमिंग 28 जुलै ते 29 जुलै
टेबल टेनिस 27 जुलै ते 10 ऑगस्ट
टेनिस 27 जुलै ते 4 ऑगस्ट
कुस्ती 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट
वेटलिफ्टिंग 7 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट
सहभागी खेळाडूंची नावे
नीरज चोप्रा (ॲथलेटिक्स) 06 ऑगस्ट 8 ऑगस्ट
निखत जरीन (बॉक्सिंग) 29 जुलै 10 ऑगस्ट
निशांत देव (बॉक्सिंग) 28 जुलै 10 ऑगस्ट
मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) ०७ ऑगस्ट ७ ऑगस्ट
पीव्ही सिंधू (बॅडमिंटन) २७ जुलै ४ ऑगस्ट
लक्ष्य सेन (बॅडमिंटन) 27 जुलै 05 ऑगस्ट
एच एस प्रणॉय (बॅडमिंटन) 27 जुलै 5 ऑगस्ट
सात्विक-चिराग (बॅडमिंटन) 27 ऑगस्ट 5 ऑगस्ट
विनेश फोगट (कुस्ती) 6 ऑगस्ट 7 ऑगस्ट
अंतिम पानगळ (कुस्ती) 07 ऑगस्ट 8 ऑगस्ट
अमन सेहरावत (कुस्ती) 06 ऑगस्ट 7 ऑगस्ट
पुरुष हॉकी संघ 27 जुलै 07 ऑगस्ट
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
पॅरिस ऑलिम्पिकचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18, डीडी स्पोर्ट्स 1.0 वरुन केलं जाईल. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान जिओ सिनेमावर देखील प्रक्षेपण केलं जाणार आहे.